सोलापूर : नव्या तंत्रज्ञानाच्या अल्कलाइन आयोनायझरचे सादरीकरण व स्पेन्का कंपनीच्या सात रस्ता परिसरातील नव्या कार्पोरेट कार्यालयाचा शुभारंभ साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते रविवारी हॉटेल बालाजी सरोवर येथे सकाळी 11 वाजता संपन्न होणार असल्याची माहिती स्पेन्काचे चेअरमन सुहास आदमने व अश्विनी आदमने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे भूषवणार आहेत. यावेळी प्रिसिजन कॅम्पशाफ्टचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा ,अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी ,शहर मध्येचे आमदार देवेंद्र कोठे व सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओम्बासे हे उपस्थित राहणार आहेत.
मोहोळ तालुक्यातील शिरापूर (सो)गावामध्ये सुहास आदमाने यांनी २०१५ साली स्पेन्का कंपनीची स्थापना केली होती. दहा वर्षांपूर्वी मिनरल वॉटरच्या उत्पादनापासून सुरू झालेला हा प्रवास आज फ्लेवर मिल्क, सॉफ्ट ड्रिंक, एनर्जी ड्रिंक, अल्कालाईन वॉटर ,चहा अशा गुणवत्ता पूर्ण उत्पादनापर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा,गोवा येथील पाच हजाराहून अधिक हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या माध्यमातून लाखो नागरिकापर्यंत स्पेन्का मिनरल वॉटर हा ब्रँड पोचला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथेही स्पेन्काच्या माध्यमातून प्लांट उभारण्यात आला आहे.
पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये लाखो भाविकांना व वारकऱ्यांना मिनरल युक्त पाणीपुरवठा स्पेन्काच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून केला जात आहे .गुणवत्तापूर्ण उत्पादन, आपुलकीची सेवा, उत्तम व्यवस्थापनयामुळे स्पेन्का हा भारतातील एक नामांकित ब्रँड म्हणून ओळखला जात आहे .भविष्यामध्ये अनेक उत्तम व आरोग्यदायी उत्पादन देण्याच्या हेतूने स्पेन्का अल्कलाइन आयोनाझर ग्राहकासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या आयोजनायझरचे अनावरण ११ मे रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचेही आदमने यांनी सांगितले.
