22 डिसेंबर रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभांचे आयोजन
सोलापूर – केंद्र शासनाने दिलेल्या सूचनानुसार स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत हागणदारी मुक्त अधिकचे ध्येय साध्य करण्यासाठी गाव स्तरावर वैयक्तिक शौचालय व सार्वजनिक शौचालयाची बांधकाम तसेच सांडपाणी-घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण करून गावे शाश्वत करण्यासाठी राज्यात 30 ऑक्टोबर पासून विशेष स्वच्छता अभियान राबविले जात आहे. या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावात् हे अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले आहे.
या विशेष अभियानांतर्गत ज्या कुटुंबाकडे शौचालय बांधणे शिल्लक आहे, अशा कुंटुबाची यादी तयार करून त्यांना शौचालय बांधकामाचा लाभ तसेच, सांडपाणी व्यवस्थापनासाठी वैयक्तिक शोषखड्डे करण्यावर भर् देणे, घनकचऱ्यासाठी खतखड्डे (कंपोस्ट पीट,नाडेप) तयार करून व्यवस्थापन करणे. तसेच प्लास्टिक संकलनासाठी सेग्रीकेशन शेड, कचरा उचलण्यासाठी ट्राय सायककल आवश्यक आहे. यासाठी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी तालुक्यातील गावांचे नियोजन करून गावे हागणदारी मुक्त यासाठी यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना गावे दत्तक देऊन चाळीस दिवसाच्या अभियानातून गावे शाश्वत स्वच्छ करावेत असे आवाहन आव्हाळे यांनी केले आहे.
शौचालयाचा नियमित वापर होण्यासाठी शौचालय बांधकाम तांत्रिक दृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे. सदर बांधकाम योग्य प्रकारे होत असल्याची खात्री करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, संबंधित ग्रामपंचायत, विविध स्तरावरील तांत्रिक अधिकारी, शाखा विस्तार, विस्तार अधिकारी, तालुका समन्वयक व समूह समन्वयक हे ग्रामपंचायतीत् कामांची पाहणी करतील तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षा कडून सर्व गावांची पडताळणी करण्यात येईल. गाव स्वच्छतेसाठी 40 दिवसांचे अभियान महत्त्वाचे असून सदर अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी केले आहे.
22 डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभा
हागणदारी मुक्त अधिक साठी राज्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये येत्या 22 डिसेंबर 2023 रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेमध्ये नव्याने बांधण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांच्या नावांना मान्यता देणे तसेच शौचालय बांधकामासाठी प्रबोधन करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करणे, दिनांक 31 डिसेंबर 2023 पूर्वी शौचालय बांधकाम होण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा करणे. दिनांक 1 जानेवारी 2024 नंतर गावात एकही कुटुंब उघड्यावर शौचास् जाणार नाही या दृष्टीने आवश्यकता त्या सर्व उपाययोजना करून ग्रामस्थांना या संदर्भात प्रबोधन करणे. तसेच हागणदारी मुक्त अधिक साठी लागणारे ठराव, व्हिडिओ चित्रीकरण आदी विषय या विशेष ग्रामसभेत घेण्यात येणार आहेत.
शौचालय अपुर्ण ठेवणारे ग्रामसेवक यांची वेतनवाढ रोखणार – सिईओ आव्हाळे…………….
जिल्हयात स्वच्छ भारत मिशन चे कामाशी पंधरावा वित्त आयोगाचा निधी लिंक केला आहे. शौचालय पुर्ण न करणारे ग्रामसेवक यांना या पुर्वी दोन वेळा लेखी नोटीस दिले आहे. या अभियानात एक जरी शौचालय मागे ठेवलेस वेतनवाढ रोखणार आहे तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ची कामे वेळेत पुर्ण न करणारे ग्रामसेवक यांचे सेवा पुस्तकात नोंद घेणार असल्याचे सिईओ आव्हाळे यांनी सांगितले.