मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा अध्यक्षपद रिकामे आहे. यासाठी आता लवकरच नियुक्ती केली जाणार असून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. कालच नवं सरकार स्थापन झालं आहे. या सरकारकडून लवकरच विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.
२०१९ पूर्वी राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्ये होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीवेळी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत सत्तांतर होऊन महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांचा हिरमोड झाला. पक्षांतर करूनही काही फायदा न झालेल्या राधा कृष्ण विखे पाटलांना आता विधानसभेच्या अध्यक्षपदाची सुत्रे मिळण्याची शक्यता आहे