येस न्युज मराठी नेटवर्क : करोनानंतर लवकरच आम्ही पुन्हा नाइट लाइफ सुरू करणार आहोत, अशी घोषणा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू केल्यानंतर हळूहळू आम्ही सर्व बाबी सुरू केल्या आहेत, अजूनपर्यत तरी कोणतीही बाब बंद करण्याची वेळ आलेली नाही. त्यामुळे नाइट लाइफदेखील लवकरच सुरू करू, असेही त्यांनी सांगितले. मुंबईत गेल्या वर्षी २६ जानेवारीला नाइट लािफ संकल्पना अंमलात आणण्यात आली होती. मात्र त्यानंतर काही दिवसांनी लगेचच करोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊन केल्याने नाइट लाइफ सुरू होताच बंद झाले. मात्र आता ते पुन्हा सुरी करण्याच्या हालचाली आदित्य ठाकरे यांनी सुरू केल्या आहेत. सोलापूरकर मात्र स्मार्ट सिटीने सुशोभित केलेल्या हरिभाई देवकरण प्रशालेजवळील रस्त्यावर रात्रीची खाऊगल्ली सुरु करण्याबाबत विचार करीत आहे.