‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली सोनू म्हणजेच अभिनेत्री निधी भानूशाली सध्या फारच चर्चेत आहे. बोल्डनेसने तिने साऱ्याचच लक्ष वेधले आहे. निधी सध्या अॅक्टींग पासून दूर आहे. मात्र तिच्या फोटोंनी तिने साऱ्याचंच लक्ष आकर्षित केले आहे.

त्यामुळे निधीचे फोटो सोशल मीडियावर कामालिचे व्हायरल होताना दिसत आहेत.तारक मेहतामध्ये पूर्वीच्या सोनूची भूमिका तिने निभावली होती. त्यानंतर तिची मोठी फॅनफॉलोइंगही तयार झाली होती. अभिनयापासून दूर असली तरीही सोशल मीडियावर ती फार सक्रिय असते. तिची मोठी फॅनफॉलोइंगही आहे.
निधी सध्या आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करत आहे. आणि त्यामुळेच तिने अभिनयातून ब्रेक घेतला आहे.सोनू हे बालकलाकार पात्र तिने साकारले होते . मात्र आता निधी मोठी झाली आहे. तिच्या लुक्समध्येही फार बदल झाला आहे.काही दिवसांपूर्वीच तिने तिचा एक स्विमींग व्हिडीओ शेअर केला होता. जो प्रचंड व्हायरल झाला होता.