सोलापूर : कोरोना महामारीच्या काळापासून संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या समाजघटकांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत करणारी अभिनेता सोनू सूद यांची संस्था सूद चॅरिटी फाउंडेशन सोलापुरातील आई-वडिलांचे छत्र छाया हरपलेल्या आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत कला आणि स्पोकन इंग्लिश वर्गाचे आयोजन केला आहे. या दोन कोर्सेसच्या माध्यमातून चित्रकार व विश्वविक्रमवीर विपुल मिरजकर यांच्यामार्फत चित्रकला, पेंटिंग कलेचे आणि प्रा नागराज खराडे यांच्यामार्फत इंग्रजी संभाषण कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या दोन्ही कोर्सेस ची सुरुवात सोमवार, 7 नोव्हेंबर रोजी होणार असून आठवड्यातून तीन दिवस कला आणि तीन दिवस स्पोकन इंग्लिश चे वर्ग दाजी पेठ येथील पुलगम शोरूम जवळ घेतले जाणार आहेत. या मोफत कोर्सेसचा लाभ घेण्यासाठी 5 नोव्हेंबर पर्यंत चित्रकार विपुल मिरजकर(8055928066) यांच्याकडे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. या उपक्रमाचा सोलापुरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन अभिनेते सोनू सूद यांनी केले आहे.