वारंवार येणाऱ्या तक्रारीला कंटाळून बारा वर्षाच्या पोटच्या मुलाचा नायलॉन दोरीने गळा आवळून खून केल्याप्रकरणी पित्याला माळशिरस जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणेकर यांनी जन्मठेप व दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
प्रशांत अर्जुन सावंत असे शिक्षा झालेल्या पित्याचे नाव आहे.आरोपी प्रशांत यांचा मुलगा आलोक हा लहान वयातच गुटखा खात होता. चोऱ्या करीत होता.
त्यामुळे तो मुलावर चिडून होता.29 नोव्हेंबर 2021 रोजी शेजारी राहणारे धाईंजे यांनी मुलाने चोरी केल्याची तक्रार वडिलांकडे केली होती.तेव्हा वडिलांनी रागाच्या भरात सायंकाळी सव्वा सहा ते रात्री नऊ वाजे दरम्यान अकलूज शहरातील श्रीराम थिएटरच्या पाठीमागे चिलारीच्या काटेरी झुडपात मुलाला घेऊन तेथे नायलॉन दोरीने गळा आवळून खून केला.या खटल्यात सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले.वकील एस टी मेंढेगिरी व सहायक सरकारी वकील एस एस पाटील यांनी काम पाहिले.कोर्ट पैरवी म्हणून हवालदार रियाज तांबोळी व पोलीस नाईक पी. एन. भोसले यांनी काम पाहिले.

