सोनाली कुलकर्णी तिच्या सोशल मीडिया हँडलद्वारे तिच्या आयुष्यातील वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते.
सोनाली तिच्या आजीच्या खूप जवळची म्हणून ओळखली जाते, तिने मागील पोस्टमध्ये तिचा उल्लेख केला होता.काही महिन्यांपूर्वी तिने तिची आजी गमावली.त्यामुळे तिने यंदा गणेशोत्सव साजरा केला नाही.
नवदुर्गा म्हणजे नऊ दुर्गा ही दुर्गेचे नऊ वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रकटीकरण आहे.आपण नेहमी आपल्या आयुष्यात नवदुर्गा अनुभवत असतो त्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजे सोनाली म्हणते माझ्या आयुष्यात पहिलं स्थान पहिली नवदुर्गा ही माझी आजी आहे.
नवरात्रीसाठी तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे,ती म्हणाली, “आज घटस्थापना. माझी आजी घट बसवायची. आज ती नसली तरी मनाच्या देवाऱ्यातील नवदुर्गांमध्ये पहिली जागा कायम तिचीच असेल. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.”