सोलापूर : अत्याधुनिक टेलिस्कोप द्वारे खंडग्रास सूर्यग्रहण तसेच आकाश दर्शन अनुभवण्याची संधी सोलापूर विज्ञान केंद्रने उपलब्ध करुन देणार आहे. खंडग्रास सूर्यग्रहणाचे औचित्य साधून सोलापूर विज्ञान केंद्राने अत्याधुनिक टेलिस्कोप द्वारे सूर्यग्रहण तसेच आकाश दर्शन अनुभवण्याची संधी उपलब्ध करुन देणार आहे.
सूर्य, चंद्र आणि पृथ्वी जवळजवळ एका रेषेत येतात, आणि चंद्र सूर्याला झाकून ठेवताना दिसेल, त्याला सूर्यग्रहण म्हणतात. 25 ऑक्टोबरला सोलापूरात सूर्यग्रहण संध्याकाळी 04:55.50 वाजता सुरू होईल आणि सूर्यास्तासह 05.54.52 वाजता समाप्त होईल. हे खंडग्रास सूर्यग्रहण असून देशात अनेक ठिकाणी दिसणार आहे. यापूर्वी सोलापूरात 21 जून 2020 खंडग्रास सूर्यग्रहण दिसले होते. ते सूर्याचा 54.1% भाग चंद्राने व्यापलेला होता. 25 ऑक्टोबरलाही सूर्याचा 20.6% भाग चंद्राने व्यापलेला असेल. पुढील सूर्यग्रहण (30.2%) सोलापूरात 5 वर्षानंतर 2 ऑगस्ट 2027 रोजी दिसणार आहे.
ही एक दुर्मिळ खगोलीय घटना आहे. कोणतीही अंधश्रद्धा मनात न बाळगता, आपण शास्त्रोक्त चष्म्यातून सूर्य ग्रहण पहावे. उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहिल्यास डोळ्यांना इजा होऊ शकते. या संपूर्ण खगोलीय घटनेचा आपण आपल्या कुटुंबासमवेत आनंद घ्यावा असे आवाहन सोलापूर विज्ञान केंद्राचे संग्रहालय अभिरक्षक श्री राहुल दास यांनी केले आहे.
सूर्यग्रहण आणि आकाश दर्शन करिता रु.30/- शुल्क असेल.
सूर्यग्रहाणाचा प्रारंभ: 4.55.50 PM
समाप्त (सूर्यास्त) : 5.54.10pm
आकश दर्शन : 6.30 to 8.30 pm