येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोनामुळे जगभरातील उद्योगावर संक्रात आली असताना सोलापूरच्या बालाजी अमाईन्स या केमिकल कंपनीने नेत्रदीपक अशी उद्योग भरारी घेतली आहे. बालाजी अमाईन्स ने पाठी मागील वर्षाच्या तुलनेत संपलेल्या आर्थिक वर्षात तब्बल 33 टक्के व्यवसाय वाढवत 1227 कोटींचे उत्पादन केले असून 185 कोटींच्या मालाची परदेशात निर्यात केली आहे. कंपनीने 231 कोटींचा निव्वळ नफा कमविला आहे. जगभरातील केमिकल इंडस्ट्री मध्ये टॉपमोस्टमोस्ट मध्ये असलेल्या बालाजी अमाईन्स च्या हैदराबाद तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी आणि सोलापुरातील चिंचोली MIDC मध्ये दोन असे एकूण चार ठिकाणी कंपन्या आहेत. केमिकल कंपनी तसेच सोलापुरातील बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेल या सर्वांचा विचार केला तर बालाजी समूहाने पंधराशे लोकांना रोजगार दिला आहे. सोलापूरचे नाव सातासमुद्रापलीकडे पोहोचविणाऱ्या तसेच एक यशस्वी उद्योजक म्हणून तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या आणि सोलापूरच्या विमान सेवेसह अनेक मूलभूत प्रश्नांवर सोलापूरकरांना चिंतन करायला लावणारी राम रेड्डी यांची शिवाजी सुरवसे यांनी घेतलेली ही मुलाखत अवश्य ऐका
सोलापूरकरांचा अभिमान बालाजी अमाईन्स कंपनी
रेमेडसीवर इंजेक्शन, कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन यामध्ये वापरले जाते बालाजी अमाईन्सचे उत्पादन
जगभरातील 60 देशात बालाजी अमाईन्सच्या केमिकलची निर्यात
90 एकरावर चिंचोली एमआयडीसीतील नवीन युनिट सुरू झाल्याने उत्पादन वाढले
गेल्या वर्षी 919 कोटी तर या वर्षी 1227 कोटींच्या मालाचे उत्पादन
गेल्या वर्षी 177 कोटींचा एक्सपोर्ट यावर्षी 185 कोटी
डायबिटीससह अनेक लाइफ सेविंग ड्रग्ज मध्ये बालाजी अमाईन्सचे बाय प्रॉडक्ट वापरतात
सोलापूर सहनशील म्हणून विमानसेवा सुरू होत नाही