No Result
View All Result
- सोलापूर -19- सोलापूर जिल्हा परिषद प्रा. शिक्षकांचे जिल्हा परिषद स्तरावरील प्रलंबीत असलेले प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा “30 जानेवारी” ला गुरुसेवा परिवारातील शिक्षक समन्वय संघटनांच्या वतीने जिल्हा परिषद गेटसमोर धरणे आंदोलन करू असा ईशारा गुरुसेवा परिवाराच्या वतीने शिक्षणाधिकारी संजय जावीर यांना निवेदन देऊन करण्यात आल्याची माहिती शिक्षक नेते शिवानंद भरले, अंकूश काळे व मच्छींद्रनाथ मोरे आदींनी एका पत्रकान्वये प्रसिध्दीस दिली आहे.
- याविषयी वीरभद्र यादवाड, राजा राऊत, सुर्यकांत हत्तूरे, राम बिराजदार, जुल्फीकार मुजावर, बब्रुवान काशिद, सूर्यकांत व्हनमाने, मसूद सिध्दकी आदी पदाधिकाऱ्यांच्या सहीने शिक्षणाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. 29 जानेवारी पर्यंत शिक्षकांचे प्रश्न सोडवा.. गरज पडल्यास संघटनेची बैठक लावा..अन्यथा 30 जाने. ला धरणे आंदोलन करणार असे या निवेदनात म्हटले आहे.
- निवेदनात शिक्षकांना 1. केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदी पदोन्नती घ्यावी. 2. सर्वच शिक्षकांच्या सेवापुस्तकांची पडताळणी करावी. 3 ) आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाना वेतनवाढ दयावी. 4 ) पात्र शिक्षकांना वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी देण्यात यावी. 5 ) पगाराची रोटेशन पद्धत बंद करून जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा पगार एकाच वेळी एक तारखेला करण्यात यावा. 6) कोटक महिंद्रा बँक पगारातून वगळून ट्रेझरी सी.एम.पी. ची अंमलबजावणी करण्यात यावी. 7) सेवानिवृत्तीस होणाऱ्या शिक्षकांना नोटीस बजावण्यात अधिकार गटशिक्षणाधिकारी यांना दयावा 8) 30 % विषय शिक्षकांना पदविधर वेतनश्रेणी दयावी. 9) शिक्षकांच्या वैद्यकीय अग्रीम देयकेकरिताच्या अनुदानाची तरतूद तात्काळ उपलब्ध करून द्यावी. 10) कन्नड व उर्दू शिक्षकांचे रोस्टर अद्ययावत करण्यात यावी. 11) जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम करण्यात यावी. 12) सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता दयावा. 13) तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षण सेवकांना नियमित केल्याचे आदेश देण्यात यावेत. 14) अकारण निलंबित केलेल्या शिक्षकांना त्वरित पूर्नस्थापित करण्यात यावी. या व इतर मागण्या करण्यात आल्या.
- यावेळी अनिरूध्द पवार, रमेश घंटेनवरू, बाबा शेख, एकनाथ भालेराव, लक्ष्मण कोळी, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
No Result
View All Result