सोलापूर । आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक सचिन चव्हाण यांची कन्या सुहानी चव्हाण टिफीन टाइम या मराठी चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट ६ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे, सिध्दार्थ जैन आणि मिलिंद वासते यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात दिग्दर्शक म्हाळसाकांत कौसडीकर, कॅमेरामन गौरव कुलकर्णी, वेशभूषा अश्विनी कौसडीकर यांनी काम पाहिले आहे. सुहानीसह प्रज्ञा फडतरे, विपुल साळुंके, नुपूर चितळे, डॉ. गिरीश ओक, अरुण नलावडे, विद्या भागवत, शांतनू गंगणे, ज्योती चव्हाण आदींच्या भूमिका आहेत.