येस न्युज मराठी नेटवर्क : राष्ट्रीय धावपटू साईश्वर व श्रद्धा केशव गुंटूक हे दोघे आजपर्यंत अनेक ठिकाणी धावण्याच्या स्पर्धेत भाग घेत सोलापूरचे नावलौकिक महाराष्ट्रात व इतरही अनेक राज्यात केले आहेत. हे आपण वेळोवेळी वृत्तपत्रे आणि बातम्यांमधून पाहिलात. गेली 5 ते 6 वर्षापासून या बंधू भगिनी मिळून पहाटे 2:30 वाजता उठून ग्राउंडवर सरावासाठी जात असतात. सोलापुरात सिंथेटिक ग्राऊंड नसल्याने अधूनमधून कर्नाटक येथील स्टेडियमवर सरावासाठी जात असतात. या दोघांचे आणि यांच्या पालकांचे एकच ध्येय आहे की साईश्वर व श्रद्धा यांनि आपल्या भारतासाठी सुवर्ण पदक मिळवून देण्यासाठी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करावे. त्यादृष्टीने साईश्वर व श्रद्धा दररोज अथक परिश्रम घेत आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात लॉकडाऊन असतानादेखील पहाटे मैदानावर सराव करण्यासाठी जात असे. बऱ्याच वेळा त्यांच्या वडिलांना दंडही भरावा लागला. हे सर्व करण्याचे एकमेव कारण म्हणजे रनिंगमध्ये भारताला आजपर्यंत न मिळालेले सुवर्ण पदक मिळवून भारताचे जगात नावलौकिक करण्याचे आहे. तर आज जे अन्याय श्रध्दा सोबत करण्यात आले आहे. ते कुणा इतर खेळाडूंसोबत घडू नये यासाठी श्रद्धाने शपथ घेतली आहे की, यापुढे मी सोलापूर जिल्ह्यातुन एकही स्पर्धा खेळणार नाही. आज माझ्या एकटीच्या त्यागामुळे भविष्यात पुन्हा कोणत्याही खेळाडूंवर अन्याय होणार नाही याची दक्षता सोलापूर अथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी घ्यावी. पहाटे 2:30 वाजता उठून जर हे फळ मला मिळत असेल तर यांच्यापेक्षा मोठा अन्याय कोणताच नाही. म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. आज जे अन्याय माझ्यावर झाले आहे ते असेच यापूर्वीही एकदा माझ्यासोबत घडले आहे. जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या स्पर्धेत मी प्रथम क्रमांक पटकावूनसुद्धा मला वगळण्यात आले होते. याअगोदरसुध्दा कितीतरी वेळा असे नियमबाह्य खेळी घेतले गेले. हे असेच जर एखाद्या वयात आलेल्या खेळाडूसमवेत झाला असता ती नक्कीच एखादी टोकाची भूमिका घेऊन स्वतःचे भविष्य उध्वस्त करून घेतली असती. म्हणून ही चूक पुन्हा भविष्यात कधीच घडू नये यासाठी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व पंच यांनी योग्य ती दक्षता घ्यावी. जेणेकरून कोणाचे नुकसान होऊ नये. आणि एखाद्या खेळाडूच्या मानसिकतेशी खेळण्याचा अधिकार कोणालाच नाही. म्हणून मी सोलापूर जिल्ह्यातुन कधी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो माझा अंतिम निर्णय आहे. नियमांत राहून स्पर्धे आयोजित करावे आणि पात्र खेळाडूचीच निवड करण्यात यावी.