येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूरच्या विमान सेवे संदर्भात तसेच सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणी बाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सिद्धेश्वर कारखान्याच्या गळीत हंगाम सध्या सुरू आहे शेतकऱ्यांची नुकसान होऊ नये म्हणून गळीत हंगाम संपल्यानंतर आम्ही चिमणी पाडून आणि चिमणी पाडल्यानंतर लगेच विमान सेवास देखील सुरू होईल याबाबत पाठपुरावा करू असे म्हणाले तसेच बोरामणी विमानतळ देखील भविष्यात झालेच पाहिजे यासाठी शासन आग्रही असून येथील 33 हेक्टर माळढोकची जमीन देखील डिफॉरेस्टिंग करण्यासंदर्भात मी माझ्या पातळीवर पाठपुरावा करत आहे असे देखील राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले सोलापूर जिल्ह्यामध्ये पर्यटन वाढावे उद्योग वाढावे यासाठी जिल्ह्याचा आराखडा करावा असे आदेश देखील त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.