नागरी विमान वाहतूक मंत्रालयात आज महाराष्ट्रातील सोलापूर येथील विमानतळासंदर्भातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू, राज्यमंत्री. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली.
यावेळी खालील प्रमुख मुद्याच्या बाबतीत चर्चा झाली व लवकरात लवकर सोलापूर येथील विमातळ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
- केंद्र सरकारने उडान-आरसीएसच्या माध्यमातून सोलापूर विमानतळावर ५० कोटी रुपये खर्च करून विविध विकासकामे केली आहेत.
- विमानतळावर आवश्यक मनुष्यबळांना प्रशिक्षण देणे सुरू असून लवकरच हे दल सेवेत दाखल होणार आहे.
- डीजीसीए लायसन्सची प्रक्रिया आणि इतर तांत्रिक गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना मंत्रीमहोदयांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
सोलापूर-मुंबई,सोलापूर-तिरुपती, सोलापूर-दिल्ली, सोलापूर-हैदराबाद आदी विमानसेवा सुरू करण्याबाबत विविध विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा केली.
या बैठकीत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू, मा.राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष एम सुरेश आमदार सचिन कल्याण शेट्टी उपस्थित होते