सोलापूर : सोलापूरच्या होटगीरोड विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्यास अडथळा ठरणारी सर्व न्यायालय,केंद्र शासन,राज्य शासन,एअरपोर्ट ऑथोरिटी व डी,जी,सि,ए,सर्वांनी त्यांच्या विरोधात निर्णय दिलेली. सिद्धेश्वर सहकारी साखर करखान्याची अनधिकृत चिमणी अद्याप का हटवली जात नाही, 25/11/2019 पासून आज 11 महिने उलटून गेले तरी शासन दरबारी कोणताही ठोस निर्णय होत न्हवता म्हणून मागील 10 दिवसापासून सोलापुरातील अनेक सामाजिक व व्यापारी संस्था यांचे एक शिष्ठमंडळ आयुक्त श्री पी, शिवशंकर,पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,निवासी उप- जिल्हाधिकारी देशमुख यांना भेटून न्यायालयाचा अवमान होत आहे असे निदर्शनास आणून दिले त्यांचे म्हणणे असे आले जिल्हाधिकारी यांचा आदेश येऊ दे मग पुढील निर्णय आम्हि घेऊ. पालिका आयुक्त तर म्हणाले वि आर रेडी व आम्हितर पडकाम करणाऱ्या ऐजन्सी टेंडर काढून 2017 लाच ऍडव्हान्स पैसे पण देऊन ठेवले आहेत,जिल्हाधिकारी आज कार्यालयात रुजू झाल्यानंतर सर्व सविस्तर घटनाक्रम त्यांच्या समोर मांडला व पालिका आयुक्तांनी 17/07/2020 रोजी दिलेल्या पत्राची कॉपी माहिती अधिकार खाली मागवलेली ती ही त्यांना दिली व नम्रपणे सांगितले की सर्वोच्च न्यायालयाने आपल्या नावाने स्पष्ट आदेश दिला असताना आपण कॊणाची वाट बघत आहात. शेवटी सर्व कागद पत्राचा मी पूर्ण अभ्यास केला आहे व पुढील सात दिवसात चिमणी पडण्या संबधी सर्व खात्यास आदेश काढणार असे आश्वासन दिले. वरील शिष्ठमंडळात चेंबर मानद सचिव व विमानतळ सल्लागार समितीचे माजी सदस्य केतनभाई शहा,वेकअप सोलापूर फौंडेशन चे अभियंता मिलिंद भोसले,गिरीकर्णीका फौंडेशन चे विजय जाधव,उद्योजक संजय थोबडे,मर्चंटनेव्ही चे विश्वनाथ गायकवाड,सोलापूर शोसल चे ऍडव्होकेट प्रमोद शहा,आय टी इंजिनियर आनंद पाटील,स्मार्ट सोलापूर फेडरेशन चे गणेश शिलेदार ई हाजर होते, सिद्धेश्वर सहकारी साखर करखान्या ची अनधिकृत चिमणी सोबत बांधकाम विभागाने त्यांचा etp प्लांट,बॉयलर बांधकाम ई सुद्धा अनधिकृत आहे असे 2014 सालीच नोटीस देऊन कळविले आहे. सोलापूर ची विमानसेवा होटगिरोड विमानतळावरून लवकरच सुरू होईल अशी आपण सर्व आशा बाळगुया.