• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, February 13, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

दक्षिण-पश्चिम विभागीय युवा महोत्सवामध्ये सोलापूर विद्यापीठाची उल्लेखनीय कामगिरी!

by Yes News Marathi
February 13, 2026
in इतर घडामोडी
0
दक्षिण-पश्चिम विभागीय युवा महोत्सवामध्ये सोलापूर विद्यापीठाची उल्लेखनीय कामगिरी!
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तब्बल १३ पारितोषिके मिळवून चमकदार यश

सोलापूर – अखिल भारतीय विश्वविद्यालय संघ, नवी दिल्ली यांच्या वतीने म्हैसूर येथे आयोजित ३९ व्या दक्षिण-पश्चिम विभागीय युवा महोत्सव-2026 मध्ये  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने ऐतिहासिक व अभूतपूर्व अशी कामगिरी नोंदवित एकूण १३ पारितोषिके पटकावली. त्यामध्ये ११ वैयक्तिक व सांघिक स्पर्धांतील बक्षिसांसह दोन विभागांतील सर्वसाधारण विजेतेपदे मिळवून विद्यापीठाने आजवरची सर्वोच्च कामगिरी साध्य केली आहे. विभागीय महोत्सवाच्या इतिहासात प्रथमच विद्यापीठाला वैयक्तिक आणि सामूहिक कलाप्रकारांत एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने पारितोषिके मिळाल्याने हा विक्रम विशेष ठरला आहे.

दि. ९ ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत उत्साहपूर्ण वातावरणात ही स्पर्धा झाली. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांतील एकूण ३६ विद्यापीठांचा सहभाग लाभलेल्या या महोत्सवात विविध कला प्रकारांतील चुरशीच्या स्पर्धांनी रंगत आणली.

ललित कला विभागात ‘जनरल चॅम्पियन ट्रॉफी’मध्ये द्वितीय क्रमांक
ललित कला विभागात विद्यापीठाने एकूण द्वितीय विजेतेपद मिळवले. कार्टूनिंग आणि पोस्टर मेकिंग या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले. तसेच कोलाज आणि ऑन द स्पॉट पेंटिंग या प्रकारांत चतुर्थ क्रमांक, तर रांगोळी स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळवून सर्वांगीण गुणवत्ता दाखवून दिली.

वाङ्मय विभागात तृतीय क्रमांक
वाङ्मयीन स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. ‘जनरल चॅम्पियन ट्रॉफी’मध्ये तृतीय क्रमांक पटकावत विद्यापीठाने आपली बौद्धिक ताकद सिद्ध केली. हिंदी वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक, तर हिंदी वादविवाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून विद्यार्थ्यांनी प्रभावी मांडणी व विचारशक्तीचे दर्शन घडवले.

इतर कला प्रकारांमध्येही यशाची नोंद
मीमिक्री स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत विद्यार्थ्यांनी अभिनय कौशल्याची छाप पाडली. फोक ऑर्केस्ट्रा आणि क्रिएटिव्ह कोरिओग्राफी या प्रकारांत चतुर्थ क्रमांक, तर तालवाद्य स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळवत सांघिक सादरीकरणातही विद्यापीठाने भरीव कामगिरी केली.

विद्यापीठाच्या या यशाबद्दल कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे तसेच विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध तयारी आणि सर्जनशीलतेच्या जोरावर हे यश संपादन केल्याचे त्यांनी नमूद केले.या यशामुळे विद्यापीठाची कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील गुणवत्ता अधोरेखित झाली असून भविष्यातही अशाच प्रकारे राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल यश मिळवण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Previous Post

अक्कलकोट रोड स्मशानभूमी; प्रशासनाची प्रत्यक्ष भेट

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In