सोलापूर – अखिल भारतीय विश्वविद्यालय संघ,दिल्ली आयोजित ३९ वा राष्ट्रीय युवा महोत्सव सत्यभामा विद्यापीठ,चेन्नई येथे दि.१० ते १४ मार्च २०२६ दरम्यान संपन्न झाला.या महोत्सवात देशातील सर्व राज्याचे एकूण १४२ विद्यापीठे सहभागी होती.या महोत्सवात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने यशाची परंपरा कायम ठेवत वैयक्तिक आणि सामुहिक कलाप्रकारात पाच पारितोषिके प्राप्त केली आहे.देशात बक्षीसे मिळविण्याच्या वर्गवारीत टॅाप टेनमधे विद्यापीठ आहे,तर राज्यात तिसऱ्या स्थानी आहे.विद्यापीठाची ही कामगिरी देदीप्यमान आणि ऐतिहासिक आहे.


विद्यापीठाने खालील बक्षीसे प्राप्त केली आहे.
१.हिंदी वक्तृत्व-प्रथम
२.मिमिक्री-प्रथम
३.शोभायात्रा-व्दितीय
४.कार्टुनिंग-व्दितीय
५.वादविवाद-तृतीय
