सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजस सेंटरच्या संचालकपदी मुंबई येथील एसएनडीटी विद्यापीठाच्या प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्नीकचे प्राचार्य डॉ. सचिन लड्डा यांची नियुक्ती झाली आहे. गुरुवारी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार, मानवविज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. विकास कदम यावेळी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त तज्ञ समितीने त्यांची ही निवड केली आहे. उद्योजकतेला वाव देण्यासाठी राज्यातील प्रत्येक विद्यापीठांमध्ये इनक्युबेशन सेंटरची स्थापना झाली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी व त्यांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. विद्यापीठ आणि विविध कंपन्या आणि त्या माध्यमातून रोजगार निर्मितीतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा या सेंटरचा प्रमुख उद्देश आहे. अशा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील इनक्युबेशन सेंटरच्या संचालकपदी मुंबईचे लड्डा यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करून उद्योजक पिढी घडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही डॉ. लड्डा यांनी दिली आहे.