सोलापूर : सोलापूर – अक्कलकोट रस्त्यावरील मल्लिकार्जुन नगराजवळ एका भरधाव ट्रकने रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्या व्यक्तींना जोरदार धडक दिल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात शुक्रवारी (ता. 4) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झाला असून, अपघातातील जखमींना उपचारासाठी तसेच मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर अपघातग्रस्त ट्रकमुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असून, पोलिस प्रशासनाकडून क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त ट्रक बाजूला घेण्याचे काम सुरू आहे. अपघातातीत मृतांची व जखमींची नावे अद्याप समजू शकली नसून, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस व कर्मचारी घटनास्थळी दाखल आहेत.