चोर सापडले; फिर्याद देण्यासाठी खातेप्रमुखांची टाळाटाळ
सोलापूर : सोलापूरात भरदिवसा पालिकेच्या लोखंडी ड्रेनेज झाकणची चोरी करताना आढळून आल्याने दोघांना झाकण चोरी करताना सापडले आहे. हकीकत अशी की चार दिवसांपूर्वी गणेशोत्सव मध्ये प्रभाग 3 भवानी पेठ घोंगडे वस्ती भागात ड्रेनेज झाकण चोरीला गेल्याचे तक्रार नगरसेवक सुरेश पाटील यांच्या कडे आली होती. संबंधित तक्रारीची दखल गेत प्रभागात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पाटील यांनी केले होते. यानंतर दिनांक 21 सप्टेंबर 2021 रोजी शकली 10 ते 11 दरम्यान दोन अनोळखी माणसे भवानी पेठेतील पठाणबाबा दर्गा बाजू बोळातील कुंभार यांच्या घराजवळील लोखंडी ड्रेनेज झाकण काढताना आढळून आले. रिक्षामध्ये झाकण चोरी करण्यासाठी वापर करत असताना चालकासह एक व्यक्ती चोरी करत आहे असे दिसून आले आहे. याप्रसंगी माहिती मिळताच सुरेश पाटील यांचे स्वीय सहाय्यक विजय कोळी यांना कळवून त्या भागाची पाहणी करण्यासाठी सांगितले.
यानंतर त्या ठिकाणी विजय कोळी यांनी घटनास्थळी पाहणी करून प्रभागाच्या सीएसआय बसवराज जमादार, जेई अंजना कोने यांना कळवले यावेळी राजकुमार पाटील व बिपीन पाटील यांनी घटनास्थळी भेट देत याची चौकशी केली असता दोन अनोळखी इसम चोरीच्या उद्देशाने आल्याचे समजले. घटनास्थळी झालेली घटना जोडभावी पेट पोलीस चोकी ला कळवले. यानंतर पोलिसांनी घटनासाठी दाखल होऊन दोघांना ताब्यात घेतले. यानंतर फिर्याद दाखल करण्यासाठी पालिकेच्या खातेप्रमुखकडून टाळाटाळ करण्यात आले. यानंतर पोलिसांनी चार ते पाच तास झाले अद्याप फिर्याद दाखल करून घेतले नाही. आजवर या इस्मानी कोणकोणत्या भागात आणखी चोरी केली आहे याची चौकसी करावं असं मागणी पाटील यांनी केले आहे. गुन्हा उघड झाल्यानंतर पोलिसांनी लवकरात लवकर फिर्याद दाखल कराचे सोडून उलट सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोणतेच फिर्याद व गुना दाखल केले नाही असे कळले आहे.
आजवर शहरात सम्राट सिटीच्या नावाखाली अनेक भागातील लोखंडी ड्रेनेज झाकण चोरीला गेल्याचे दिसत आहे. लक्ष्मी मार्केट परिसरातील लवालोखंड दुकानात अनेकदा ड्रेनेज झाकण दिसून आले आहे. या दोघांनी आणखी किती चोरी केली आहे व पालिकेच्या साहित्याची किती चोरी केली आहे याची पोलिसांनी माहिती काढून गुन्हा दाखल करावे आजवर पालिकेच्या लाखोची मालमत्ता चोरीला गेले तरी कोणतेच फिर्याद दाखल केले नाही. पालिकेतील कर्मचारी साहित्य चोरीला गेल्यावर फिर्याद दाखल करण्यास टाळाटाळ केले तर पालिकेतून निलंबनाची कारवाई करण्यात यावी यासाठी आयुक्तांना व संबंधित नियंत्रण अधिकारी धनराज पांडे यांना फोन द्वारे कळवले आहे.
- सुरेश पाटील, नगरसेवक