उजनीतून भीमा नदीत ज्यादा पाणी सोडल्याची चौकशी करू
सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत घोषणा करतील असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसापूर्वी सोलापुरात दिला होता. त्यामुळे या दौऱ्याकडे लक्ष लागले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी कोणतीच घोषणा केली नाही. त्यामुळे हा दौरा म्हणजे नुसताच फार्सच झाल्याचे दिसते. मुख्यमंत्र्यांनी अक्कलकोट तालुक्यात जाऊन काही शेतकऱ्यांशी संवाद साधला. तीन वाजता त्यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी कोणतीही घोषणा न करता त्यांनी शेतकऱ्यांना काळजी करू नका शासन तुमच्या पाठीशी आहे असे आश्वासन दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरातील कुंभार घाट दुर्घटनेत मयत झालेल्यांच्या वारसदारांना प्रत्येकी १० लाखाचे धनादेश आले.
पंतप्रधानांनी मला फोन करून मदत देण्याची तयारी दर्शवली आहे. याचे कोणीही राजकारण करू नये असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणले. उजनी धरणातून अचानकच खूप मोठ्या प्रमाणात भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. यामुळे भीमा नदीला पुराचा तडाखा बसला यामध्ये पाटबंधारे अधिकाऱ्यांची चूक नाही. या प्रश्नल उत्तर मुख्यमंत्री म्हणाले, याबाबतीत आपण योग्य ती माहिती घेऊन चौकशी करू. मात्र सध्या संकट टाळणे गरजेचे असल्यामूळे याकडेच आमचे फोकस आहे. या पत्रकार परिषदेस मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेट्टीवर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री दादा भुसे, आ. प्रणिती शिंदे आदी उपस्थित होते. पहा मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत काय म्हणाले…