सोलापूर | मार्ड संघटनेच्या डाॅक्टरांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला अाहे. त्याच्या मागण्यांवर कोणतीही चर्चा अथवा लेखी काहीच मिळाले नाही. मात्र वैद्यकीय शिक्षण संचालक यांनी व्हीसीद्वारे मंत्र्यासमावेत मार्डच्या डॉक्टरांची बैठक होणार होती. मात्र रात्री उशिरापर्यंत कोणीही बैठक अथवा निवासी डॉक्टरांच्या मागण्याबाबत काहीच चर्चा केली नाही. मागण्याचे गांभीर्य प्रशासनाला कळाले नाही, त्यामुळे तत्काळ सुविधाही देणार नाहीत, अशी भूमिका डॉक्टरांनी घेतल्याची माहिती डॉ. स्वप्नील काजळे यांनी दिली. सध्या डॉक्टरांनी जनरल वार्ड, नियमित शस्त्रक्रिया बंद असल्यामुळे रुग्णांवर परिणाम होत आहे. शेवटी प्रोफेसर डॉक्टरांना सेवा बजावावी लागत आहे.