येस न्युज मराठी नेटवर्क : आज श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा 726 वा समाधी सोहळा आहे. महाराष्ट्रात अनेक मंदिर आहेत, पण सोलापुरातील ज्ञानेश्वर महाराजांचे जे मंदिर आहे..तसे मंदिर आपल्याला कुठे ही पहायला मिळणार नाही…सोलापुरातील देगाव येथे 1945 साली वैकुंठवासी ह.भ. प.बंडोबा महाराज लेंडवे यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज या मंदिराची स्थापना केले आहे.. या मंदिरात 1970 पासून आजतागायत रोज नित्यनेमाने कार्यक्रम सुरू आहेत.
या मंदिरात सलग 40 महिने अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्याचा संकल्प सुरू आहे.. तसेच 1111 कीर्तनकरांचे कीर्तन संपन्न होणार आहेत.हे सर्व कीर्तनकार निष्कामतेने आपली सेवा करून जातात. याविषयी अधिक माहिती मंदिराचे प्रमुख ह.भ.प. मुरलीधर महाराज लेंडवे यांनी दिली…आम्ही मंदिराच्या शेजारी राहतो पण आम्हाला माइकचा किंवा मंदिरातील कोणत्याही कार्यक्रमाची कोणताही अडचण नाही..असे कुमार जगताप सांगतात..या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून आम्ही या ठिकाणी सेवा करण्यासाठी येतो..वारकऱ्यांना जेवण तयार करून देण्यात जो आनंद आहे तो आनंद आम्हाला कुठे मिळत नाही अस या ठिकाणी स्वयंपाक करणाऱ्या महिला सांगतात…