येस न्युज मराठी नेटवर्क : रोजगार मेळावा-2022 मोहिमे अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे 71 हजार युवकांना नियुक्ती पत्र प्रदान केले. या मोहिमे अंतर्गत केंद्र सरकारच्या विविध विभागामध्ये एकुण 10 लाख नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आणि नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान ‘रोजगार मेळावा’ सुरू केला. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, या प्रसंगी, पंतप्रधान 71,000 नव्या नियुक्तींना नियुक्ती पत्रे दिली गेली.
रोजगार मेळाव्याचा शुभारंभ 22.11.2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानंतर सोलापुर रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार डोहरे यांच्या हस्ते 42 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले. उमेदवारांना संबोधित करताना नीरज कुमार डोहरे यांनी नवनियुक्त उमेदवारांचे अभिनंदन करताना रेल्वेसाठी कठोर आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला दिला. यावेळी वरिष्ठ विभागीय अभियंता चंद्रभूषण यांनी रेल्वेच्या संरक्षेविषयी मार्गदर्शन केले.
या कार्याक्रमासाठी वरिष्ठ विभागीय कर्मिक अधिकारी जी. पी. भगत, वरिष्ठ विभागीय अभियंता चंद्रभूषण, वरिष्ठ विभागीय वित्त प्रबंधक विवेक होके, वरिष्ठ विभागीय सिग्नल एवं टेलिकॉम अभियंता राहुल गौंड विभागीय यांत्रिक अभियंता संजय साळवे, कार्मिक अधिकारी शेख मस्तान उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य कल्याण निरीक्षक सचिन बनसोडे, महावीर निमानी, प्रणव पावडे, अजय सावंत, अक्षय गर्दने, नागेश नवले, संजीव कुमार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विभागीय कार्मिक अधिकारी रमेश अय्यर यांनी केले.