सोलापूर— सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटी च्या माध्यमातून ICCC (कमांड अँड कन्ट्रोल सेंटर)व इंद्र भवन इमारतीची पहाणी आज पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे , पोलीस उपयुक्त अजित बोराडे, संगणक विभाग प्रमुख स्नेहल चपळगावकर, सहाय्यक अभियंता किशोर सातपुते,मतीन सय्यद,उमर बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण करणेकामी केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी अशा इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या अमंलबजावणी करणेकरीता नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आले असून त्या मध्ये पोलिसांकडील आवश्यकत्या सुविधाचे एकत्रीकरण करणेत येणार आहे.
तसेच शहरातील सुरक्षा व्यवस्था अबाधित राखणेकामी शहरातील १३० ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत. त्या संदर्भात व इतरही माहिती पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी घेतली. महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली- उगले यांनी कमांड अँड कन्ट्रोल सेंटर यासंदर्भात पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्याशी शहरातील सुरक्षा व्यवस्था बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.