सोलापूर- आयुक्त पी शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तकार्यालय येथे “माझी वसुंधरा अभियान 2.0” व “राष्ट्रीय स्वच्छ वायु उपक्रम” अंतर्गत शहर परिसरात उपलब्ध ओपन स्पेस, रोड साईड परिसर, रोड डिव्हायडर व इतर मोकळ्या जागेत हरित पट्टा विकसित करणेच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणेकामी शहरातील सर्व पर्यावरण प्रेमी संस्था, सामाजिक संस्था, शासकीय,निमशासकीय संस्था व नागरीक यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती.सदर बैठकीमध्ये उपायुक्त धनराज पांडे यांनी प्रस्तावणेमध्ये मागील वर्षभरात सोमपा कडुन अभियानाच्या अनुषंगाने करणेत येत असलेल्या कामाची व विविध योजनांची माहिती देऊन चालु वर्षांमध्ये 1 लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पुर्ण करणेकरिता सर्व संस्थांच्या माध्यमातून आराखडा तयार केला असुन सदर आराखड्यात महानगरपालिकाकडुन जागा उपलब्ध करणे, खड्डे तयार करणे, मातीची सुविधा उपलब्ध करणे व STP मधील प्रक्रिया केलेल्या पाण्याची उपलब्धता करून देणेचे नमुद केले असुन सर्व संस्था, नागरिक यांनी वृक्षांची उपलब्धता करून देणेचे नमुद करणेत आले असुन ऑगस्ट 2021 अखेर राबविण्याचे एकमताने ठरविण्यात आले.
तसेच सर्व प्रतिनिधीनी शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपुरक करणेकामी टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तुंचा वापर करून रस्त्याचा दुतर्फा सुशोभीकरण करून वृक्षारोपण करणेबाबत आपले विचार सादर केले असुन नागरिकांनी आपले जन्मदिना निमित्त व आपले प्रिय व्यक्तीच्या आठवणीत वृक्षारोपण केलेस त्याची माहिती मनपास कळविल्यास त्याची प्रसिद्धी FM व मीडियाच्या माध्यमातून देण्यात येईल.तसेच मा आयुक्तसो यांनी सर्व NGO यांना आव्हान केलेकी 1 लाख वृक्षारोपण करणेकामी सर्वांनी एकत्रित सहभाग नोंदविणे आवश्यक आहे तसेच आजला शहरातील वाया जाणारे पावसाचे पाणीचा पुनःवापर व साठवणूक करणेकामी नागरिकांनी रेनवॉटर हार्वेस्टिंगचा वापर करावा तसेच त्यास प्रोत्साहन देणेकरिता मनपा टेक्स मध्ये 2 ते 5 % सवलत देखील देणार असलेबाबत सांगुन मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविणे करिता आव्हान केले. सदर बैठकीस सहा आयुक्त, उद्यान अधीक्षक, पर्यावरण व्यवस्थापक तसेच इको नेचर क्लब, निसर्ग माझा सखा, WCF, गिरीकर्णीका फाउंडेशन, जिल्हा पर्यावरण गतीविधी, इको क्लब, GIB फाउंडेशन, बॅंक ऑफ बडोदा, सुमेध फाउंडेशन, संभव फाउंडेशनचे प्रतिनिधी व पर्यावरण प्रेमी नागरीक हे उपस्थीत होते.
