महापालिका पुन्हा देणार पाडकामाची अंतिम नोटीस – आयुक्त
येस न्युज मराठी नेटवर्क : सिद्धेश्वर कारखान्याच्या बेकायदेशीर चिमणीला महापालिकेने यापूर्वीच 478 नुसार पाडकामाची नोटीस दिली आहे. आता हायकोर्टाच्या आदेशानुसार डीजीसीए तसेच महापालिकेला फेर सर्वे करण्याचे आदेश दिले होते. आम्ही त्यांची सुनावणी देखील घेतली. आता हायकोर्टामध्ये कोणताही विषय प्रलंबित नाही .त्यामुळे चिमणी पाडकामा बाबत अंतिम नोटीस पुन्हा सिद्धेश्वर कारखान्याला दिली जाणार असून आठ दिवसात त्यांनी स्वतःहून चिमणी पाडावी अन्यथा आम्ही महापालिकेच्या माध्यमातून ही चिमणी पाडून असे नोटिसीमध्ये पुन्हा नमूद केले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली.
सोलापूरच्या विमान सेवे संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार असल्याचे सोलापूर विकास मंचने जाहीर केले होते. मात्र मुख्यमंत्री कार्यालयातील टास्क फोर्सचे प्रमुख राधेश्याम मोफलवार यांनी ही व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर महापालिका आयुक्त पी शिवशंकर, होटगी रोड विमानतळ चे प्रमुख चॅम्पला बोरामणी विमानतळचे व्यवस्थापक सज्जन निचळ आदी उपस्थित होते. कोण कोणते अडथळे आहेत याबाबत महापालिका तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून मोफलवार यांनी माहिती घेतली. जे अडथळे आहेत ते तातडीने दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असे आदेश मोफलवार यांनी दिले. सिद्धेश्वर कारखान्याची 92 मीटर उंचीची चिमणी बेकायदेशीर आहे हे देखील अधिकाऱ्यांनी यावेळी मोफलवाऱ्यांना सांगितले. पूर्वीची चिमणी उजव्या बाजूला तर नवीन चिमणी डाव्या बाजूला असल्यामुळे विमान उड्डाण करतेवेळी तसेच उतरतेवेळी अडथळा निर्माण होऊ शकतो ही चिमणी मुख्य अडथळा आहे त्याशिवाय इतर किरकोळ अडथळे आम्ही लगेच काढू शकतो असे देखील अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं. होटगी रोडवरील विमान तळ व्हीआयपी लोकांना देखील बंद करण्यात आले होते. मात्र सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे होटगी रोडवरील विमानतळ व्हीआयपी लोकांना देखील बंद करण्यात आले होते मात्र आता सुरक्षा व्यवस्था मिळाली असल्यामुळे व्हीआयपीं ना त्यांची विमाने उतरण्यासाठी परवानगी दिली असल्याचे विमानतळाचे व्यवस्थापक चॅम्पला यांनी सांगितले. या ठिकाणी एकच रनवे आहे त्यामुळे आजवर सिद्धेश्वर कारखान्याने रणवे बाबत सांगितलेली माहिती चुकीचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.