सोलापूर – सोलापूर शहरातील मिळकतीचा सर्व्हेक्षण करणेकामी पथके तयार करण्यात आलेली आहेत. शहरामध्ये बन्याच मिळकतीची कर आकारणी झालेली नाही. याबाबत सर्व्हे करून नविन मिळकती, नळ जोडणी इत्यादीबाबतची सविस्तर माहिती संकलीत पेठनिहाय पथके नियुक्त करण्यात आलेली आहे. याबाबत आज मा. आयुक्त यांनी आढावा घेतला असता त्यामध्ये शहरामध्ये खाजगी चाळीच्या मालकाच्या मनपा दफ्तरी नोंद आहे. तथापी ते सदर चाळीचा / जागेचा मनपा कर भरत नसल्याचे दिसून येते. तसेच सदर चाळीच्या जागेवर व खुल्या जागेवर नवीन इमारती / अपार्टमेंट बांधकाम झालेले आहेत तथापि सदर चाळीचा / खुल्या जागेचा म.न.पा. कर भरत नसल्याचे दिसून आल्याने खालील प्रमाणे कार्यवाही करणेबाबत मा. आयुक्त यांनी आदेश दिलेले आहेत.
सोलापूर शहरामध्ये बराच खाजगी जागांवर चाळ स्वरुपाचे बांधकाम असून, त्याचा वापर बऱ्याच वर्षापासून राहणारे भाडेकरी करीत आहेत. अशा चाळ स्वरुपाच्या इमारती हया एकाच मालकीच्या असून, या इमारतींच्या कब्जाबाबतचे वाद अथवा अन्य कारणामुळे मे. न्यायिक कार्यवाही सुरु असल्याने अशा मिळकतीच्या कराची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. सदरची मिळकत कराची थकबाकीची रक्कम भरण्यास जागा मालक अथवा भाडेकरु हे असमर्थता दर्शवितात त्यामुळे बऱ्याच वर्षापासून मिळकत कराची वसुली होऊ शकली नाही.
यास्तव सोलापूर शहर हद्दीतील चाळ स्वरुपाच्या इमारतीचा मिळकत कर वसूल होण्याच्या दृष्टीने अधिनियमातील तरतूदीनुसार चाळीतील जागेचा वापर करणाऱ्या व्यक्तिस भोगवटादार म्हणून मनपा मिळकत कर दफ्तरी नोंद घेऊन, वापरात असलेल्या जागेचा मिळकत कर (प्रत्येकाच्या नांवे हिश्शेराशीने होणाऱ्या थकबाकीसह) भरण्याची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. चाळीमध्ये राहणारे भाडेकरी यांनी तेथे चाळीच्या मुळ बांधकामामध्ये बदल करुन नव्याने बांधकाम व स्वतंत्र्यरित्या खाजगी नळ घेतलेला असून त्याच्या पाणीपट्टीसह मिळकत कर वसुली करण्याची कार्यवाही हाती घेण्यात येत आहे.
याबाबत खाजगी चाळ मालकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या मालकीच्या चाळीचा मिळकत कर त्वरीत भरून याबाबत आपली कोणती हरकत असल्यास ७ दिवसाचे आत लेखी स्वरुपात प्रशासनाकडे आपले म्हणणे सादर करावे, आपले म्हणणे प्राप्त न झाल्यास उक्त प्रमाणे कार्यवाही ठेवणेस आपली कोणतीही हरकत नसल्याचे गृहित धरून पुढील उचित कार्यवाही ठेवणेत येईल याची नोंद घ्यावी. तसेच खुल्या जागेवर बोधलेल्या इमारतीचे खुल्या जागेच्या मिळकतदारानी मिळकत कराची रक्कम त्वरित भरून नव्याने बांधलेल्या इमारती / अपार्टमेंटची आकारणी करुन घ्यावी अन्यथा सदर इमारती/ अपार्टमेंटमध्ये रहात असलेल्या व्यक्तींची भोगवटादार म्हणून आकारणी करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
वरील प्रमाणे कार्यवाही ठेवत असताना, मनपाच्या दफ्तरी भोगवटादार म्हणून नोंद घेतल्यामुळे जागेच्या मालकी हक्काबाबत कोणताही दावा अथवा हक्क सांगता येणार नाही. अशाप्रकारे चाळीच्या मिळकतीवरील असलेली मिळकतकराची थकबाकी त्याच इमारतीत राहणान्या सर्व भोगवटादार यांचेवर हिश्शेराशीने निश्चित केल्यामुळे मनपाची मिळकतकराची थकबाकी वसुल होण्यास मदत होणार आहे.