सोलापूर — सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकारी/कर्मचारी साठी ‘हर घर तिरंगा’ मोहीम २०२५-२६ अंतर्गत १४ ऑगस्ट २०२५ रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे देशभक्ति गीत व संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देशभक्तीपर गीते, सांस्कृतिक सादरीकरण आणि ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम पार पडले.




कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, ‘हर घर तिरंगा’ शपथ आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख उपस्थित होते यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा एक भाग म्हणून १२ ऑगस्ट २०२५ रोजी महापालिकेच्या कौन्सिल हॉल येथील आयोजित रांगोळी स्पर्धेत शहरातील विविध बचत गटांतील ५५ महिलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विजेत्यांना आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.रांगोळी स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजया विकास गायकवाड, द्वितीय क्रमांक ज्योती कटारे, तृतीय क्रमांक उषा काकडे, उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक चित्रा भांगे, उत्तेजनार्थ दुसरा क्रमांक सुवर्णा कुणाल जगताप यांनी पटकावला. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांना प्रोत्साहनपर बक्षीसही देण्यात आले.आमदार विजयकुमार देशमुख यांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, आपल्या घरावर तिरंगा सन्मानाने फडकवून देशाप्रती अभिमान व्यक्त करावा, असे आवाहन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची माहिती देत प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या दर्शनी भागात राष्ट्रध्वज लावावा, असे सांगितले. त्यांनी विद्यार्थी ना राष्ट्रध्वजाच्या निर्मितीची , ध्वजाची माहिती घेऊन ती इतरांना सांगाव या बद्दलही आवाहन केले.या कार्यक्रमात शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीते आणि नृत्ये सादर केली. तसेच, महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही गायन आणि वाद्यवृंदाचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत भरली.यावेळी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेसाठी सेल्फी पॉइंट आणि स्वाक्षरी मोहीम यांसारखे उपक्रमही राबवण्यात आले. या कार्यक्रमा साठी पालिकेचे ओमप्रकाश वाघमारे, अजितकुमार खानसोळे (प्र. कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी), राजेश परदेशी (विद्युत विभाग प्रमुख), युवराज गाडेकर (मालमत्ता कर प्रमुख), सूर्यकांत खेसगे (सहा. मालमत्ता कर विभाग) आणि रजाक पेंढारी (प्र. कार्यालय अधीक्षक, सामान्य प्रशासन विभाग) अंजली काकडे, समीर मुलणी, गणेश बिराजदार आदी उपस्थित होते.