सोलापूर : प्रिसिजन उद्योग समुहा मुळे सोलापूरचे नाव सातासमुद्रापलीकडे पोहोचवणारे उद्योजक यतीन शहा आणि सुहासिनी शहा ,साहित्याच्या माध्यमातून प्राणी आणि पक्ष्यांचे संशोधन जगासमोर मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली आणि अनेक आरोपीचा कर्दनकाळ बनलेले एडवोकेट प्रदीपसिंह राजपूत या तिघांचा सोलापूर महापालिकेने मानपत्र देऊन गौरव केला.सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात गुरुवारी सायंकाळी खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य आमदार सुभाष देशमुख महापौर श्रीकांचना यन्नम या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला.
प्रारंभी महापौर श्री कांचना यन्नम यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली उद्योजक यतीन शहा आणि सुहासिनी शहा तसेच एडवोकेट प्रदीप रजपूत यांचा यावेळी या प्रमुख मान्यवर मान्यवरांनी महापालिकेचे मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला याच बरोबर सोलापूर शहराचे नाव लौकिक करणाऱ्या क्रीडा पत्रकारिता आणि क्षेत्रातील व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या सत्काराला उत्तर देताना उद्योजक यतीन शहा म्हणाले सोलापूर बद्दल आता दररोज चांगले बोलायला सुरुवात करा आजवर अनेक पुरस्कार मिळाले मात्र सोलापूर महापालिकेचा हा पुरस्कार खूप मानाचा आहे. यावेळी ॲडव्होकेट प्रदीप राजपूत यांनीही मनोगत व्यक्त केले. अवघ्या मोजक्या शब्दांमध्ये मारुती चित्तमपल्ली यांनी आपल्या भावना व्यक्त करत सोलापूरचे ऋण व्यक्त केले. यानंतर खासदार सुभाष देशमुख यांनीही गौरव मूर्तींचे कौतुक केले. महापालिका आयुक्त पी शिवशंकर नगरसेवक रियाज खैरादि आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती वाघमारे यांनी केले तर महापालिकेतील पक्ष नेते श्रीनिवास करली आणि आभार मानले.