येस न्युज मराठी नेटवर्क : थकीत करापोटीची रक्कम न भरल्याने गुरुवारी पालिकेच्या कर संकलन विभागाच्या वतीने दंवडी पिटवत सक्तीची कारवाई केली, यावेळी पालिकेच्या कर संकलन वसुली पथका कडून कारवाई करत 1181850/- थकीत मिळकतकर वसूल करण्यात आला.
पालिकेच्या कर संकलन व आकारणी विभागाच्या वतीने मालमत्ता कर वसुलीचे विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरातील थकबाकीदारांना आवाहन करण्यात आले होती कि अभय योजना सुरू केलेले आहे.या योजनेमध्ये शहरातील मालमत्ता कर थकबाकीदार ज्यांच्या टॅक्सवरती शास्ती लावण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत सोलापूर शहरातील नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करून सवलतींचा लाभ घ्यावा असे ही सांगितले होते. पालिका आयुक्त पि. शिवशंकर यांच्या आदेशानुसार तसेच उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागप्रमुख प्रदीप थडसरे हद्दवाढ विभाग प्रमुख रुउफ बागवान यांच्या उपस्थिती आज शहरातील विविध ठिकाणी व होटगी रोड,58 पेठ,60 पेठ, या ठिकाणी मिळकत कर न भरलेल्या कारवाई करण्यात आले.
त्या अनुषंगाने सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी इथल्या नागनाथ नगरातील अशोक कोरमकोंडा यांच्या कारखान्याच्या थकबाकीसाठी महापालिकेने गुरुवारी सकाळी ढोल-ताशाच्या गजरात जप्तीची अनोखी कारवाई केली.तसेच दोन नळ कनेक्शन कट करण्यात आले.तरी नागरिकांनी आपले टॅक्स लवकर भरावे अन्यथा आपल्या मिळकत कर न भरल्यास प्रथम नळ कनेक्शन कट करण्यात येईल.त्यानंतर त्यांच्या घरावर जप्ती करण्यात येईल तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आव्हान महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.
