सोलापूर : 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते महापालिकेत ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी यन्नम यांनी सर्व शहरवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली,विरोधी पक्षनेते अमोल शिंदे,आयुक्त पी.शिवशंकर,परिवहन सभापती जय साळुंखे,महिला व बालकल्याण सभापती कल्पना कारभारी,मनपा अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे,गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते रियाज खैरादी,उपायुक्त जमीर लेंगरेकर,उपायुक्त धनराज पांडे,नगरसेवक नागेश भोगडे, नगरसेवक अविनाश बोंमडयल,नगरसेविका श्रीदेवी फुलरे ,नगरसेविका मनीषा हुच्चे, नगरसेविका राजेश्री चव्हाण,आदी उपस्थित होते.