सोलापूर : सोलापूर महापालिकेतील 136 कर्मचारी व अधिकाऱ्यांना खाते अंतर्गत पदोन्नतीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आज गुरुवारी महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी पदोन्नतीचे कार्यालयीन आदेश काढले आहेत. यामुळे 6 वरिष्ठ मुख्य लेखनिक यांची कार्यालय अधीक्षक पदी पदोन्नती झाली तर 29 वरिष्ठ श्रेणी लिपिक हे वरिष्ठ मुख्य लेखनिक झाले आहेत. 47 कनिष्ठ श्रेणी लिपिकांची वरिष्ठ श्रेणी लिपिक पदी पदोन्नती करण्यात आली आहे. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. काही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत.
सोलापूर महापालिकेतील 12 संवर्गातील अवेक्षक ते कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ श्रेणी लिपिक ते कार्यालय अधीक्षक पर्यंतच्या एकूण 136 कर्मचाऱ्यांना खाते अंतर्गत पदोन्नती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी घेतला. सोलापूर महापालिकेतील बिंदू नामावली (रोस्टर) आजतागायत करण्यात आले नव्हते. ते रोस्टर महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या कारकिर्दीत अखेर तपासून घेण्यात आले. त्यानंतर आता अनेक वर्षापासून पदोन्नतीचा प्रलंबित असलेला निर्णय अखेर महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. दरम्यान आज गुरुवारी पदोन्नतीचे कार्यालयीन आदेश महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी काढले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पदोन्नतीमुळे कर्मचारी एकमेकांचे अभिनंदन करत असल्याचे दिसून आले.
सहा वरिष्ठ मुख्य लेखनिक यांची कार्यालय अधीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागातील लक्ष्मीनारायण दोंतुल यांची याच सामान्य प्रशासन कार्यालयात कार्यालय अधीक्षक पदी पदोन्नती करण्यात आली आहे. मंडई विभागातील जगन्नाथ बनसोडे यांचीही याच विभागात मुख्य अधीक्षक पदी पदोन्नती केली आहे. इतर कर्मचाऱ्यांचे नाव व पदोन्नती नंतरचे कार्यालय व पदनाम असे – विभागीय कार्यालय क्रमांक 1 येथील उज्वला डांगे ( विभागीय कार्यालय क्रमांक 4 – कार्यालय अधीक्षक), नगरसचिव कार्यालयातील जगन्नाथ माढेकर ( सार्वजनिक आरोग्य अभियंता – कार्यालय अधीक्षक), विभागीय कार्यालय क्रमांक 4 येथील ओमप्रकाश वाघमारे ( नगरसचिव कार्यालय – सहाय्यक नगरसचिव), घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील सुरेश खसगे ( मालमत्ता कर – कर अधीक्षक) आदी.
वरिष्ठ श्रेणी लिपिक यांची वरिष्ठ मुख्य लेखनिक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचे नाव आणि पदोन्नती नंतरचे कार्यालय असे – मालमत्ता कार्यालयातील जयवंत फुटाणे ( मालमत्ता कर कार्यालय), प्रशांत जाधव (भूमी व मालमत्ता विभाग), मल्लिनाथ तोडकर (घनकचरा व्यवस्थापन विभाग), अमर कादे (अंतर्गत लेखा परीक्षक), शलमोन रावडे (मालमत्ता कर विभाग), विलास कुलकर्णी (मुख्य लेखापाल कार्यालय – सहाय्यक लेखापाल), रवींद्र कंदलगी (विभागीय कार्यालय क्रमांक चार), नागनाथ कोकणे (मालमत्ता कर कार्यालय), नितीन परदेशी (मालमत्ता कर विभाग), चन्नप्पा म्हेत्रे ( मालमत्ता कर विभाग), जयंत क्षीरसागर (मुख्य लेखा परीक्षक कार्यालय), सुजात वाळके (विभागीय कार्यालय क्रमांक 1 ) , राजकुमार कांबळे (घनकचरा व्यवस्थापन विभाग), सुनील वाडिया( विभागीय कार्यालय क्रमांक सहा), पुष्पांजली देसाई (विभागीय कार्यालय क्रमांक आठ), अमोल पवार (मालमत्ता कर विभाग), लक्ष्मण सुरवसे (अंतर्गत लेखा परीक्षक कार्यालय), महादेव काटगावकर (विभागीय कार्यालय क्रमांक तीन), राजू शिवशिंपी (नगर अभियंता कार्यालय), प्रणिता लोखंडे (विभागीय कार्यालय क्रमांक सात), जालिंदर पकाले (सामान्य प्रशासन विभाग), सिद्राम गुडदोर (निवडणूक कार्यालय), देविदास इंगोले (अभिलेखापाल कार्यालय) , राजकुमार सोनसळे (विभागीय कार्यालय 5), सूर्यकांत पांढरे (सामान्य प्रशासन विभाग), प्रदीप जोशी (हुतात्मा स्मृती मंदिर व्यवस्थापक), चंद्रकांत दोंतुल (विभागीय कार्यालय 2), संजय जगताप (मालमत्ता कर विभाग) आदी.
यामध्ये एकूण 47 कनिष्ठ श्रेणी लिपिक यांना वरिष्ठ श्रेणी लिपिक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचे नाव आणि पदोन्नती नंतरचे कार्यालय याप्रमाणे – वसंत वाघमारे (विभागीय कार्यालय क्रमांक चार), काशिनाथ आमणे (अंतर्गत लेखापरीक्षक कार्यालय), रतनसिंग रजपूत (मालमत्ता कर विभाग), शिवकुमार धनशेट्टी (हुतात्मा स्मृती मंदिर), एलिझाबेथ शिरशेट्टी (मुख्य लेखापाल कार्यालय), भीमाशंकर पदमगोंडा (मुख्य लेखापाल कार्यालय), विकास सरवदे (मालमत्ता कर विभाग), पंडित वडतीले (आयुक्त कार्यालय), रमेश चौधरी (भूमी व मालमत्ता कार्यालय), लक्ष्मीनारायण दुभाषी (मालमत्ता कर विभाग), मिलिंद एकबोटे (सामान्य प्रशासन विभाग), पंडित जानकर (भूमी व मालमत्ता कार्यालय), प्रशांत उपळेकर (मालमत्ता कर विभाग), अरविंद दोमल( मालमत्ता कर विभाग), बाळू शिवशरण (मालमत्ता कर विभाग), भारती चोपडे (मुख्य लेखा परीक्षक कार्यालय), शिवानंद कोरे (मुख्य लेखापाल कार्यालय), शकीलअहमद कोरबू (मालमत्ता कर विभाग), सुनील व्यवहारे (मालमत्ता कर विभाग), भाग्यश्री जगताप (मुख्य लेखा परीक्षक कार्यालय), महंमदबिलाल शेख (मालमत्ता कर विभाग), रणजीतसिंग तारवाले (मालमत्ता कर विभाग) गौरीशंकरय्या स्वामी (मालमत्ता कर विभाग), यादगिरी आबत्तींनी (मुख्या लेखापाल कार्यालय), अर्चना दीक्षित (अंतर्गत लेखा परीक्षक कार्यालय), गंगाधर मलाडे (मालमत्ता कर विभाग), प्रशांत इंगळे (सामान्य प्रशासन विभाग), मोहन बुगले (उद्यान विभाग), अशोक पाटील (मंडई विभाग), मारुती गायकवाड (नगररचना कार्यालय), अंजनय्या म्हेत्रे (मालमत्ता कर विभाग), सुभाष निकंबे (मुख्य लेखापाल कार्यालय), रमेश जाधव (मालमत्ता कर विभाग), राजू पाटील (अतिरिक्त आयुक्त कार्यालय), सिद्राम पाटील (मुख्य लेखा परीक्षक कार्यालय), फिरोज पठाण (मंडई विभाग), हेमंत रासने (सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालय), उत्तरेश्वर मन्मथ चादोडे (मालमत्ता कर विभाग), तेजस्विता कासार (विभागीय कार्यालय क्रमांक आठ), आनंद शिरसागर (नगर अभियंता कार्यालय), सिद्धाराम कुंभार (मालमत्ता कर विभाग), लियाकत खैरदी (मंडई विभाग), चंद्रकांत कुडल ( सामान्य प्रशासन विभाग), शहाजहाबेगस शेख (आरोग्य विभाग), अशोक म्हेत्रे (मालमत्ता कर विभाग), सोमनाथ ताकभाते (नगर अभियंता कार्यालय), सुरेश अंभोरे (मालमत्ता कर विभाग)आदी.
या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदोन्नतीच्या पदावर आदेश मिळाल्याच्या दिनांक पासून तीन दिवसांच्या आत रुजू करून संबंधित खाद्य प्रमुखांनी विना विलंब कार्यमुक्त करावे. सेवकांनी त्यांच्याकडील असलेल्या पदाचा कार्यभार संबंधित कार्यालयाचे प्रमुख यांच्याकडे हस्तांतर करावा असे या आदेशात नमूद केले आहे.