सोलापूर – महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत कामकाजासाठी ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिली. सोलापूर महापालिकेस ई-ऑफिस प्रणाली ही महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या प्रणालीमुळे कागदपत्रांचे डिजिटायझेशन होणार असून कार्यालयात येणारे कागदपत्रांवर नियंत्रण ठेवता येईल तसेच Tracking व Control ठेवण्यास मदत होईल. कागदपत्रे/फाईल गहाळ होण्याची समस्या उद्भवणार नाही. कार्यालयातील फाईल्स या Digital स्वरूपात झाल्यामुळे कामकाज जलदरित्या होण्यास मदत होणार आहे.
नागरिकांना पत्र देण्यासाठी म.न.पा. च्या वेगवेगळ्या खात्यात जाण्याची आवश्यकता नाही. मुख्य इमारतीत कोविड-१९ कंट्रोल रुम येथेच सर्व खात्यांचे नागरिकांकडून प्राप्त होणारे टपाल स्विकारणेची व्यवस्था करणेत आलेली आहे. या प्रणालीमधून एकाच वेळेला संबंधित खात्यांना व त्यांचे अधिकाऱ्यांना पत्रे प्राप्त होणार आहेत. त्यामुळे कामात गतिमानता येणार आहे. नागरिकांना SMS द्वारे पोहच प्राप्त होईल त्यामधे संगणक नंबर नमूद असेल व त्यामुळे नागरिकांना पत्रावर काणती कार्यवाही झाली याची माहिती मिळेल.यासाठी 300 अधिकारी व कर्मचारी यांचे डिजिटल सही तयार करण्यात आली आहे.त्यांच्या ईमेलच्या माध्यमातून व ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून कार्यालयीन कामकाज सुरू करण्यात येणार आहे.यामुळे महापालिकेचा कामकाजात संगणकाचा अधिकाधिक वापर करून शासकीय कामकाजात गतिमानत व्हावे कामकाजात सुसूत्रता यावी, दस्तऐवज सुरक्षित व माहिती त्वरेने व जलद गतीने प्राप्त होऊन निर्णय प्रक्रिया सुलभ व्हावे यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने अंतर्गत कामकाजासाठी ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे अशी माहिती आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिली.