सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त यांच्या कार्यालयात आज उपायुक्त धनराज पांडे यांच्यासमवेत महापालिका अधिकाऱ्यांनी भारताचे माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मताची शपथ घेतली.यावेळी सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, नगरसचिव प्रवीण दंतकाळे,कार्यालय अधीक्षक युवराज गाडेकर ,मा.आयुक्त यांचे स्वीय साहाय्यक राहुल कुलकर्णी,शशिकांत जड्डेलु,नागेश बारड,परमेश्वर सोळगावकर,सतीश शिंदे, रुपाली दाशी, त्रंबक ताटे,अमित काळे तसेच आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी महापालिकेच्या सर्व विभागामध्ये विभागप्रमुख यांनी आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यांच्या समवेत आपल्या विभागात राष्ट्रीय एकात्मताची शपथ घेतली.