सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त सोलापूर शहरातील हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, हुतात्मा जगन्नाथ शिंदे, हुतात्मा किसान सारडा व हुतात्मा कुर्बान हुसेन यांच्या पुतळ्यास तसेच महापालिका कौन्सिल हॉल येथील आयुक्त यांच्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच हुतात्मा स्मृती दिनानिमित्त मातोश्री सेवा कुंज जोडभावी पेठ येथे त्यांच्या समाधीस व तुळजापूर वेस येथील हुतात्मा स्मारक स्तंभ येथील स्तंभास उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कौन्सिल हॉल येथील मा.आयुक्त यांच्या कार्यालयमध्ये राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस उपयुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी माझी सभागृहने ते श्रीनिवास करली, विभागीय अधिकारी व्यंकटेश चौबे, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी, श्रीमती कस्तुराबाई चौगुले, महिला व बालकल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे, उद्यान प्रमुख रोहित माने, पंडित वडतिले शिवकुमार धनशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.