• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर । व्यापाऱ्यांना दणका; गाळ्यांचा लिलाव होणारच

by Yes News Marathi
December 16, 2020
in मुख्य बातमी
0
सोलापूर । व्यापाऱ्यांना दणका; गाळ्यांचा लिलाव होणारच
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर शहरातील विमान सेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी जशी गेल्या आठ वर्षापासून गाजत आहे त्याचप्रमाणे सोलापूर शहरातील महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या गाळ्यांचा विषय गाजत आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांचाच निर्णय शासनाने मान्य केला असून आता बाजार भाव किंवा रेडीरेकनर दरानुसार व्यापाऱ्यांना भाडे द्यावे लागणार आहे. सोलापूर महापालिकेच्या मेजर आणि मिनी शॉपिंग सेंटरमध्ये 1225 गाळे आहेत. यातील बहुतांश गाळ्यांचा करार कित्येक वर्षापूर्वी संपला आहे. करार नूतनीकरण नाही.. वाढीव भाडे तर सोडाच नियमित भाडे देखील व्यापाऱ्यांनी महापालिकेत जमा केले नाही त्यामुळे आता महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी शासनाच्या आदेशानुसार या सर्व गाळ्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे हा प्रस्ताव निर्णयासाठी नव्हे तर केवळ नगरसेवकांच्या माहितीसाठी काल महापालिकेच्या सभेसमोर पाठवला होता शासनाच्या आदेशानुसारच कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका नगरसेवक सुरेश पाटील यांनी घेतली मात्र अचानकच पक्षनेते श्रीनिवास करली यांनी पलटी मारून सुचना बदललयामुळे संतप्त झालेल्या सुरेश पाटील यांनी सभागृहात माईक फेकून दिला खुर्च्यांची देखील आदळआपट केली आता व्यापाऱ्यांनी काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरले आहे त्यांच्याशी अर्थ मैत्री करण्यासाठी देखील पुढाकार घेतला आहे मात्र आता काहीही झाले तरी शासनाच्या आदेशानुसारच आयुक्तांना कारवाई करावी लागणार आहे. त्यामुळे चिमणी पाठोपाठ आता गाळ्यांचा विषय देखील चांगलाच तापणार आहे

Previous Post

पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा

Next Post

पुण्यात भीषण अपघात, भरधाव ट्रकची सात ते आठ वाहनांना धडक

Next Post
पुण्यात भीषण अपघात, भरधाव ट्रकची सात ते आठ वाहनांना धडक

पुण्यात भीषण अपघात, भरधाव ट्रकची सात ते आठ वाहनांना धडक

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group