सोलापूरच्या तापमानाने यंदाच्या वर्षीच्या हंगामातील आज सर्वोच्च पातळी गाठली. काल 42.2° असे तापमान होते तर आज तब्बल 42.8 अंश असे तापमान नोंदविले गेले. उन्हाच्या प्रचंड झळा सोलापूरकरांनी आज अनुभवल्या. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते सामसूम दिसत होते. सकाळी सूर्योदय अल्हाददायक वाटला असला तरी दुपारी मात्र हा सूर्य सोलापूरकरांवर चांगलाच कोपतोय. आजच्या या हंगामातील सर्वोच्च तापमानामुळे सोलापूरकर घामेघुम झाले. त्यामुळे आणखी दीड महिने उन्हाळा कसा असेल याची चर्चा सुरू झाली आहे.