आंतरराष्ट्रीय कलाकार दिनानिमित्त सोलापूरच्या कलाकारांनी व्यक्त केल्या भावना
आंतरराष्ट्रीय कलाकार दिनाचे औचित्य साधून सोलापूरातील कला क्षेत्राशी निगडीत संगीत, गायन, छायाचित्रण, चित्रकला, नृत्य, नाट्य, हस्तकला इत्यादी सर्व कला आविष्कारातील सोलापूरातील कलाकार आणि कलारसिकांचे अनौपचारिक भेटीचा कार्यक्रम हॉटेल अजंठा येथे आयोजित करण्यात आला होता. सोलापूरात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे उत्कृष्ट कलाकार असुन त्यांच्या कलाकृतींना योग्य प्लॅटफॉर्मची गरज असल्याचा सुर ह्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
सोलापूरातील कला क्षेत्रातील सर्व कलाकारांनी एकमेकांना सहकार्य करुन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्या विविध स्पर्धा, संमेलने, कॉन्फरन्स यांच्या माहितीची आदानप्रदान करुन सोलापूरच्या कलाकृती आणि कलाविष्कार जगभर प्रसिद्ध करुन सोलापूरच्या लौकिकात भर देण्यात योगदान देण्या विषयी एकमत उपस्थित सर्व कलाकार आणि कलारसिकांचे झाले.
परंपरिक शैक्षणा व्यतिरिक्त कला क्षेत्रातील योग्य आणि उत्कृष्ट टॅलंटला जगात मान्यता आणि राजाश्रय असुन सोलापूरात कलाकार आणि कलेविषयी असलेल्या अनास्था आपण सारे येणाऱ्या मिळुन दुर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करु असा निर्धार ह्यावेळी उपस्थित सर्व कलाकार आणि कलारसिकांचे केला. ह्यावेळी ऋत्विज चव्हाण, विजय कुंदन जाधव, विकास गोसावी, विपुल मिरजकर, देवेंद्र निंबर्गीकर, शुभम सब्बन, प्रविण रणदिवे, विठ्ठल मोरे, सचिन गायकवाड, धरराज काळे आधी मान्यवर कलाकार आणि कलारसिक उपस्थित होते.