सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सभागृह नेते शिवानंद पाटील,विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे, विजय पुकाळे, पवनकुमार यन्नम, जयप्रकाश अमनगी, शेखर सकट, सुरेश लिंगराज, समीर मुजावर, विशाल चंदेले आदी मान्यवर उपस्थित होते.