मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात (एप्रिल २०२४ ते मार्च २०२५) तिकीट तपासणीत उल्लेखनीय कामगिरी दाखवली आहे, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि तपासणी मोहिमेद्वारे ११.८३ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे.
वर्षभरात एकूण १०,९८७ तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या, ज्यामध्ये ८५० विशेष सघन मोहिमा, ६४ स्पॉट चेक आणि ३६ अॅम्बुश, क्रॉस-कंट्री आणि फोर्ट्रेस चेकचा समावेश आहे. २,५१,०३० प्रकरणांमधून एकूण ११,८२,८६,९६० रुपये वसूल करण्यात आले.
- तिकीट नसलेले प्रवासी: १,२२,१३१ प्रकरणांमधून ६,६१,१५,८०९ रुपये
- अनियमित प्रवास: १,०५,५७७ प्रकरणांमधून ४,७५,११,९२१ रुपये
- बुक न केलेले सामान: २२,१६१ प्रकरणांमधून ४२,०५,७३० रुपये
- कचरा: १,००३ प्रकरणांमधून ४,२१,९०० रुपये
- निषिद्ध क्षेत्रात धूम्रपान: १५८ प्रकरणांमधून ३१,६०० रुपये
उत्कृष्ट कामगिरी करणारे: विभागाचे यश समर्पित टीम मुळे घडले असून टॉप ३ कामगिरी करणाऱ्यांमध्ये खालील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे:
१. मोबिन शेख – ४,८६० प्रकरणांमध्ये ₹२७,६०,२८०
२. संजय ए. उबाळे – २,६८४ प्रकरणांमध्ये ₹२१,४८,१९५
३. एस. जे. शिंदे – ३,८५८ प्रकरणांमध्ये ₹२०,६५,४८५
कर्तव्याप्रती प्रामाणिक सेवा: अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यांपेक्षाही जास्त काम केले आहे, लक्षणीय योगदान दिले आहे. या वर्षी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी दक्षता आणि सार्वजनिक सेवेची प्रेरणादायी कामे देखील पाहिली आहेत:
- १२११५ सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या कोच एस३ आणि एस ४ मध्ये असामान्यता नोंदवल्याबद्दल लेखराम मीना यांना जनरल मॅनेजर सेफ्टी अवॉर्ड मिळाला.
- जीवन इंगळे यांनी ट्रेन ११०२० कोणार्क एक्सप्रेसमध्ये हॉट अॅक्सल आढळून आला, ज्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत झाली.
- राहुल एस. कांबळे यांनी ट्रेन १२११६ सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये हॉट अॅक्सल आढळून आला, ज्यामुळे सुरक्षित ऑपरेशन सुनिश्चित झाले.
- संतोष एन. प्रसाद यांनी ट्रेन १२६२७ कर्नाटक एक्सप्रेसमधील दोन अल्पवयीन मुलींना वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
सदरची तिकीट तपासणीची कामगिरी हि सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) श्रीमती कल्पना बनसोडे आणि त्यांच्या सक्रिय तिकीट तपासणी पथकाच्या नेतृत्वाचे परिणाम आहे.
सोलापूर विभाग त्यांच्या नेटवर्कमध्ये सुरक्षित आणि कायदेशीर प्रवास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील प्रभावी आकडेवारी केवळ कडक तिकीट तपासणीच नव्हे तर प्रवाशांच्या आणि रेल्वे मालमत्तेच्या संरक्षणात कर्मचाऱ्यांच्या सक्रिय भूमिकेचे देखील प्रतिबिंबित करते.