२३३ कोरोनामुक्त,तिघांचा मृत्यू
सोलापूर : जिल्ह्याचा covid-19 चा सोमवार दिनांक ५ जुलै चा अहवाल प्राप्त झाला आहे . रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील २१४ व्यक्तींना नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे २३३ कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांचे तालुकानिहाय आढावा घेतला असता माळशिरस तालुक्यात सर्वाधिक ७१, माढा तालुक्यात ४१, सांगोला तालुक्यात २९ नवीन रुग्ण आढळले आहेत. म्यूकर मायकोसिसचा आज नवीन एकही रुग्ण आढळलेला नाही.