सोलापूर : कोणीही कुठेही गेले तरी सोलापूर जिल्ह्याची संपूर्ण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राहणार आहे, असे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे समर्थक गटाने पंढरपुरात रविवारी आयोजित केलेल्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शिवसेनेने रविवारी सोलापुरात बैठक घेऊन शिंदे गटाला प्रत्युत्तर दिले.
शासकीय विश्रामगृहावर झालेल्या या बैठकीच्या वेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, ग्रामीणचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, पंढरपूरचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, माढ्याचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, दीपक गायकवाड, प्रा. अजय दासरी, शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड आदी उपस्थित होते.
अभंगराव म्हणाले, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही अनेक संकटे आली परंतु अशा संकटांना भीक न घालता ते जोमाने उभे राहिले आणि शिवसेनेचा विस्तार केला. शिवसैनिकांना हाच संघर्षाचा वारसा बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आहे. त्यामुळे शिवसेनेचे आजी – माजी पदाधिकारी एकत्र येऊन तालुक्या तालुक्यातून मिळावे आंदोलने, मोर्चे, बैठका घेऊन जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करतील आणि शिवसेना पुन्हा एकदा भरारी घेईल, असे साईनाथ अभंगराव यावेळी म्हणाले.
माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे म्हणाले, फितूर शिवसेनेतून गेले तरी शिवसेना संपणार नाही शिवसैनिकांची निष्ठा प्रामाणिक आहे. शिवसेना संपवण्याची ताकद बंडखोरांमध्ये नाही. शिवसेनेच्या आमदारांची कामे भाजपसोबत सत्तेत असतानाही होत नव्हतीच. मग तेव्हा का सरकार पाडले नाही ? फक्त सत्तेसाठी हे बंडखोर भाजप सोबत गेले हे यातून सिद्ध झाले, असेही माजी मंत्री श्री. खंदारे यावेळी म्हणाले.
याप्रसंगी पंढरपूरचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, माढ्याचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, दीपक गायकवाड, प्रा. अजय दासरी, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, भीमाशंकर म्हेत्रे, शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले.
या बैठकीस शहर उत्तरचे समन्वयक महेश धाराशिवकर, विजय पुकाळे, युवा सेनेचे जिल्हा संघटक बालाजी चौगुले, स्वप्निल वाघमारे, महेश देशमुख, सचिन बागल, जिल्हा महिला युवा अधिकारी पूजा खंदारे, उपजिल्हाप्रमुख तुकाराम भोजने, बार्शीचे तालुकाप्रमुख प्रवीण काकडे, अक्कलकोटचे तालुकाप्रमुख संजय देशमुख, उपजिल्हाप्रमुख भीमाशंकर म्हेत्रे, उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, विक्रांत काकडे, पांडुरंग पवार, सांगोल्याचे तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे, पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष संजय घोडके, उत्तर तालुका समन्वयक वजीर शेख, उपतालुकाप्रमुख संजय पोळ, युवा सेना तालुका समन्वयक प्रसाद निळ, विभाग प्रमुख सदाशिव सलगर, हुकुम राठोड, श्रीकांत येळगुंडे, प्रमोद गवळी, ज्ञानेश्वर मोरे, बापू गुजर, महिला आघाडीच्या शहर संघटिका जोहरा बेगम रंगरेज, उपजिल्हा संघटक मंगल थोरात, पुनम अभंगराव, आशा टोणपे, उपजिल्हा संघटक शशिकला चिवडशेट्टी, उपशहर संघटक छाया वायदंडे, प्रभावती अलगुंडे, सरस्वती भागवत, स्वाती रुपनर, प्रीती नायर, बार्शी तालुका संघटक मंगल पाटील, रमा सरोदे, निर्मला सोनकर, वैशाली हवनूर, ज्योती पुजारी, राजश्री उमराणी, वैशाली सातपुते, महानंदा सावंत, लक्ष्मी भंडारे, दक्षिण सोलापूर तालुका संघटक पूजा चव्हाण, अक्कलकोट तालुका संघटक वर्षा चव्हाण, विभाग संघटक संतोषी भोळे, कविता शिंदे, उपशहर संघटक सुनिता लोंढे, रुक्मिणी आपुरे आदी उपस्थित होते.
पंढरपुरात जमलेले शिवसैनिक नव्हेत तर वारकरी
शिवसेनेच्या शिंदे गटाचा मेळावा असे ज्या गर्दीला संबोधण्यात येत आहे ती गर्दी म्हणजे शिवसैनिक नव्हेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात जमलेल्या काही वारकऱ्यांना भोजनासाठी एकत्र बसवून ती गर्दी दाखवून त्याला मेळाव्याचे स्वरूप देण्यात आल्याचा आरोप साईनाथ अभंगराव यांनी यावेळी केला.