येस न्युज नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात सध्या १४ सक्रिय रुग्ण असून त्यांना कोणतीही तीव्र किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे नाहीत. दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील सहा तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव मागील महिन्यात खूपच वाढला होता. पण, आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याची स्थिती आहे. दुसरीकडे कोरोना संशयितांचे टेस्टिंग देखील दररोज सरासरी १०० पर्यंतच आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अक्कलकोट, माढा, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला व दक्षिण सोलापूर हे तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. दुसरीकडे बार्शी तालुक्यात सर्वाधिक चार रुग्ण असून तालुक्यातील ग्रामीण भागात एकही रुग्ण नाही. करमाळा व माळशिरस तालुक्यात प्रत्येकी दोन तर मोहोळ तालुक्यात एक रुग्ण आहे. पण, तिन्ही तालुक्यातील शहरी भागात कोरोनाचा एकही बाधित रुग्ण सद्य:स्थितीत नाही.