सोलापूर(जिमाका), दि. 21 :- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर केला आहे. या निकालात सोलापूर जिल्ह्याचा निकाल 92.97 टक्के इतका लागला आहे.
सोलापूर जिल्ह्यात 32 हजार 175 मुले व 24 हजार 424 मुली अशा एकूण 56 हजार 599 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यातून 29 हजार 237 मुले (90. 68 टक्के) व 23 हजार 388 मुली (95.75 टक्के) असे एकूण 52 हजार 625 विद्यार्थी (92. 97 टक्के) उत्तीर्ण झाले.
जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल 97.31 टक्के, कला शाखेचा निकाल 87. 85 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 93.3 टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल 89.51 टक्के तर विज्ञान व तंत्रज्ञानचा निकाल 93.67 टक्के इतका लागला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली आहे.