सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर याना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असून गेल्या वर्षी सुद्धा त्यांना कोरोना झाला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी लसीकरणाची मोहीम सुरु झाल्यानंतर त्यांनी कोरोनाची लस सुद्धा घेतली तरीही त्यांना पुन्हा कोरोनाने गाठले आहे. सोलापुरातील खासगी रुग्णालयात सध्या ते उपचार घेत असून त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतल कुमार जाधव यांनी दिली. जिल्हाधिकारी दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आढल्यामुळे प्रशासनातील अधिकारी घाबरले आहेत.