सोलापूर शहरामध्ये घरफोडी/चोरी संदर्भात विविध पोलीस ठाणेस गुन्हे दाखल आहेत. त्या अनुषंगाने डॉ. राजेंद्र माने, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दिपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे / विशा), प्रांजली सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे सोलापूर शहर यांनी, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना घरफोडी/चोरी संदर्भातील दाखल गुन्हयाचा बारकाईने अभ्यास करून, सदरचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत वेळो वेळी मार्गदर्शन केले होते.
त्या अनुषंगाने, सपोनि/ जीवन निरगुडे व त्यांचे तपास पथकास गुप्त बातमीदार यांचेमार्फत बातमी मिळाली की, घरफोडीचे गुन्हे करणारा सराईत आरोपी हा गड्डा यात्रेत फिरत आहे. मिळालेल्या बातमीची खात्री करून, त्यासंबंधाने सपोनि / जीवन निरगुडे व त्यांचे तपास पथकाने एका संशयीत इसमास ताब्यात घेतले.
त्यानंतर सदर संशयीत इसमाकडे घरफोडीच्या संबंधाने कसून चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव शशिकात अनिल राक्षे, सध्या रा. उस्मानाबाद असे असल्याचे सांगितले. तसेच त्याने, सन २०१६ मध्ये विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापूर शहर हद्दितील जुने संतोष नंगर, जुळे सोलापूर या ठिकाणी घरफोडी केली असल्याचे सांगितले. आरोपी शशिकांत अनिल राक्षे याने सांगितलेल्या माहितीची फिर्यादी यांचेकडे शहानिशा केली असता, त्यांचे घरी घरफोडी झाली होती व त्याबाबत विजापूर नाका पोलीस ठाणे गुरनं ७४/२०१६ भा.द.वि.सं.क.४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर, आरोपी शशिकात अनिल राक्षे याने घरफोडीवेळी चोरलेले सोन्याचे काही दागिने हे, बिड येथील सोन्याचे व्यापारी गजानन उर्फ रिंकु शेट बालाजीराव बोकन रा. दबडगावकर कॉलनी, माजलगाव, जि. बिड यांना विक्री केल्याची माहिती दिली. त्यामुळे गजानन उर्फ रिंकु शेट बालाजीराव बोकन यास अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीस अटक केल्यानंतर, त्याची मा. न्यायालयाने सुमारे ११ दिवस वेळो-वेळी पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली. सध्या आरोपी मा. न्यायालयाचे कोठडीत आहे. सदर गुन्ह्यामध्ये सुमारे ०३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. सदरचा गुन्हा तब्बल ०७ वर्षानंतर उघकीस आला आहे.
सदरची कामगिरी डॉ. राजेंद्र माने, पोलीस आयुक्त डॉ. दीपाली काळे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे, श्रीमती प्रांजली सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / जीवन निरगुडे, पोह दिलीप भाळशंकर, वाजीद पटेल, पोना योगेश बर्डे, पोकॉ संजय साळुंखे यांनी केलेली आहे.