सोलापूर : अनाधिकृत आणि बेकायदेशीर पद्धतीने बांधकाम परवाने दिल्याप्रकरणी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागातील चार जणांना निलंबित केले आहे. लाखो आणि कोट्यावधी रुपये कमवलेले काही अधिकारी अजूनही मी नाही त्यातली अशा अविर्भावात वागत आहेत. लेआउट मंजूर करणे.. बांधकाम परवानगी देणे… टीडीआर देणे… वाढीव एफएसआय तसेच बांधकाम परवाण्याला मुदतवाढ देणे अशा प्रत्येक टप्प्यावर पैसे घेतल्याशिवाय काहीच होत नाही. मनमानी पद्धतीने वाढीव एफएसआय दिले जात असल्यामुळे आणि विभागातील आवश्यक डोळे झाक करत असल्यामुळे बांधकाम परवाना विभागात लाखो रुपयांची कमाई अधिकारी करतात.
शहराच्या कोणत्याही भागात फिरा तुम्हाला शेकडो बेकादेशीर बांधकामे दिसतील. याचा रिपोर्ट करणे किंवा त्याच्यावर कारवाई करण्याची धाडस अधिकारी करत नाहीत उलट त्यातून आपल्याला कसा मलिदा मिळेल हेच पाहतात त्यामुळे डेव्हलपमेंट प्लॅनची आणि स्मार्ट सिटी योजनेची वाट लागली आहे. फक्त चारच अधिकाऱ्यांची चौकशी न करता महापालिका आयुक्तांनी नगररचना विभाग तसेच बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड केला तर शहर विकासाला नक्कीच चालना मिळेल नाहीतर पुन्हा बांधकाम विभागातील भ्रष्टाचार शिष्टाचार बनला आहे.