सोलापूर : सोलापुरात शुक्रवारी सायंकाळपर्यंत 41 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले असून यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश असून हे सर्वजण 56 ते 70 वयोगटातील आहेत. उर्वरित 67 जणांवर सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत यामध्ये चार मुलांचा आणि 33 वयस्कर लोकांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
24 एप्रिल पर्यंत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार अकराशे चार जणांपैकी 927 जणांचे कोरोनाचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 886 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 41 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अद्याप 177 लोकांचे अहवाल प्राप्त झाले नाही. 37 करोना पॉझिटिव्ह रुग्णांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून यामध्ये 25 पुरुष आणि बारा महिला आहेत .यामध्ये चार मुले असून उर्वरित ते तीस जण हे वयस्कर नागरिक आहेत अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
होम कोरंटाईन टाईन मध्ये कालपर्यंत पंधराशे पाच व्यक्ती असून केगाव येथील इन्स्टिट्यूशन कोरंटाइन मध्ये 623 व्यक्ती आहेत. ज्या भागातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले ते नऊ भाग नागरिकांसाठी ये-जा करण्यासाठी प्रतिबंधित करण्यात आले आहेत .यामध्ये तेलंगी पाच्छा पेठ, कुर्बान हुसेन नगर, मोदीखाना, शिवगंगा नगर ,जोशी गल्ली, बापुजी नगर, शास्त्री नगर, लष्कर, इंदिरानगर ,जगन्नाथ नगर शेळगी, मदर इंडिया झोपडपट्टी या भागांचा समावेश आहे. महापालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रतिबंधित क्षेत्रातील कुटुंबांचा होम टू होम सर्वे करण्याचे काम सुरू असून हा सर्वे सोमवार पर्यंत पूर्ण होईल नागरिकांनी खरी माहिती द्यावी असे आवाहन सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी केले आहे.